अधिसूचना क्रमांक १६२५/३६३६ दि.१६ फरवरी १३४३ फसली, हैद्राबाद कृषि बाजार अधिनियम क्रमांक २, १३३९ फसली आता रद्द करण्यात आलेला यातील कलम ३(१ ) आणि ३(२ ) मधील तरतुदीनुसार पूर्वीच्या हैद्राबाद राज्य शासनाने वाणिज्य व उद्योग विभागाने कृषि उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद तालुक्याच्या क्षेत्रासाठी १७/०२/१९३४ ल स्थापन होऊन प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली.
बाजारसमितीचे कार्यक्षेत्र औरंगाबाद तालुका असून औरंगाबाद तालुक्यामध्ये एकूण २०१ गावांचा समावेश आहे.
मुख्य बाजार आवार श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, जाधववाडी, औरंगाबाद येथे असून उप-बाजार (दुय्यम बाजार) करमाड व पद्मश्री सखाराम पाटील पवार, पिंप्रीराजा येथे आहेत.